Wtc Final 2023 आधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडरला दुखापत

| Updated on: Apr 30, 2023 | 4:31 PM

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. जाणून घ्या....

1 / 5
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध द ओव्हल इंग्लंड येथे खेळवण्यात येणार आहे.  याआधी दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या तिघांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यात आता ऑलराउंडर खेळाडूला दुखापत झालीय. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढलीय.

2 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात एकमेव बॉलर ऑलराउंडरचा समावेश करण्यात आलीय. मात्र शार्दुल ठाकूर हा देखील दुखापतग्रस्त झालाय. शार्दुलला दुखापतीमुळे आयपीएलमध्ये 3 सामन्यात खेळता आलं नाही. तसेच चौथ्या सामन्यात शार्दुल गुजरात जायंट्स विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला.  मात्र शार्दुल 4 बॉल खेळून भोपळा न फोडता माघारी परतला. त्यामुळे  टीम मॅनेजमेंट ठाकूरबाबत सतर्क असल्याचं दिसून येत आहे.

3 / 5
केकेआर आगामी सामना हैदराबाद विरुद्ध 4 मे रोजी खेळणार आहे.  आता या सामन्यासाठी ठाकूर फीट होतो का, याकडे लक्ष असणार आहे.  टीम इंडियाला बॉलिंग ऑलराउंडरची उणीव भासतेय. तर हार्दिक पंड्या याने स्वत:ला कसोटी क्रिकेटपासून दूर ठेवलंय. मी 5 दिवसांच्या सामन्यासाठी फीट नसल्याचं पंड्याचं म्हणनं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियात आर अश्विन, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या तिघांनी ऑलराउंडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

4 / 5
शार्दुल ठाकूर याने आतापर्यंत या 16 व्या सिजनमील 6 सामन्यांमध्ये 69 च्या सरासरीने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर 101 धावा केल्या आहेत. शार्दुलने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि  इंग्लंडमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याला ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.  त्यामुळे शार्दुलचं फीट  होणं टीम इंडियासाठी महत्वाचं असणार आहे.

5 / 5
शार्दुलने फर्स्ट क्लास आणि कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे.  शार्दुलने 8 कसोटी साम्यांमध्ये 27 विकेट्स  घेतल्या आहेत.  तसेच 3 अर्धशतकांच्या मदतीने  254 धावा केल्या आहेत. शार्दुलने  प्रथम श्रेणीतील 73 सामन्यांमध्ये   242 विकेट्स घेतल्या आहेत. तर 13 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 541 धावा केल्या आहेत.