IPL 2024 : मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्यानंतर ‘या’ पाच खेळाडूंना घेणार आपल्या ताफ्यात! वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचं नावही चर्चेत
आयपीएल 2024 स्पर्धेची सध्या जोरदार तयारी सुरु झाली आहे. स्पर्धेसाठी तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यात मिनी ऑक्शनपूर्वी फ्रेंचाईसीमध्ये बरीच उलथापालथ होताना दिसत आहे. 19 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. त्यामुळे आता कोणते खेळाडू कोणत्या संघात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पाच खेळाडूंना स्थान मिळेल अशी चर्चा आहे.
1 / 7
आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण मागच्या दोन पर्वात हवी तशी कामगिरी झाली नाही. आता 17 व्या पर्वासाठी संघांमध्ये खेळाडूंचा अदानप्रदान झालं आहे. त्यामुळे 19 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनला महत्त्व आलं आहे. मुंबई इंडियन्सकडे 17.5 कोटी रुपये असून यात पाच खेळाडू घेण्याचा मानस आहे. यात वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचं नावंही चर्चेत आहे.
2 / 7
आयपीएलच्या पुढच्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या रुपाने मोठी डील केली आहे. गुजरात टायटन्सशी 15 कोटींची ट्रेड करून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. हार्दिक पांड्या याच्या व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स या पाच खेळाडूंना विकत घेऊ शकते.
3 / 7
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने नुकताच वनडे वर्ल्डकप 2023 जिंकला आहे. मागच्या पर्वात पॅट कमिन्स खेळला नव्हता. टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप आणि एशेज सीरिजसाठी त्याने नाव मागे घेतलं होतं. आता तो पुन्हा एकदा आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. मुंबईने जोफ्रा आर्चरला रिलीज केलं असून पॅट कमिन्स त्याला चांगला पर्याय ठरू शकतो.
4 / 7
वानिंदु हसरंगा याला आरसीबीने रिलीज केलं आहे. त्यामुळे हसरंगावर मिनी ऑक्शनमध्ये नजर असेल. 26 वर्षीय हसरंगा टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. मुंबईच्या संघात त्याला संधी मिळू शकते.
5 / 7
हर्षल पटेल यालाही आरसीबीने रिलीज केलं आहे. 2021 मध्ये हर्षल पटेलला पर्पल कॅप मिळाली होती. पण मागच्या दोन पर्वात हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स हर्षलला आपल्या संघात घेऊ शकते. पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल ही जोडी गोलंदाजीला धार देऊ शकते.
6 / 7
जेसन होल्डर याच्याकडेही मुंबई इंडियन्सची नजर लागून आहे. पोलार्डच्या जागी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पोलार्डने 2022 मध्ये निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याची जागा जेसन होल्डरच्या रुपाने भरण्याचा प्रयत्न आहे.
7 / 7
गेराल्ड कोएत्झी हा अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असून वर्ल्डकपमध्ये आपली छाप सोडली आहे. त्याने 8 सामन्यात 20 गडी बाद केले होते. जोफ्राच्या जागी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.