IPL 2024 Opening Ceremony : खेळाडूंआधी कलाकार करणार धमाका, कोण कोण असणार?
IPL 2024 Opening Ceremony Stars : सीएसके विरुद्ध आरसीबी असा सलामीचा सामना असल्याने आयपीएलच्या 17 व्या मोसमाची जोरात सुरुवात होणार, हे निश्चित आहे. मात्र त्याआधी आणखी धमाका करण्यासाठी कलाकार मंडळी सज्ज आहे.
1 / 6
आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा श्रीगणेशा शुक्रवार 22 मार्चपासून होतोय. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु भिडणार आहेत.
2 / 6
यंदाच्या मोसमातील पहिला सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम अर्थात चेपॉक येथे आयोजित करण्यात आला आहे. इथेच पहिल्या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे.
3 / 6
या ओपनिंग सेरेमनीमध्ये कोणते कलाकार परफॉम करणार आहेत, याबाबतची माहिती आयपीएलने दिली आहे. या यादीमध्ये मिस्टर खिलाडी अर्थात अक्षय कुमार आणि दिग्गज सिंगर एआर रहमान यांचा समावेश आहे.
4 / 6
या रंगारंग कार्यक्रमाला संध्याकाळी साडे सहा वाजता सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम लाईव्ह जिओ सिनेमावर पाहता येईल.
5 / 6
रंगारंग कार्यक्रमात अक्षय कुमार, एआर रहमान यांच्याव्यतिरिक्त अभिनेता टायगर श्रॉफ आणि डीजे एक्सवेल हजर राहणार आहेत.
6 / 6
आयपीएलच्या गेल्या हंगामातील ओपनिंग सेरेमनीला अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि रश्मिका मंदाना यांनी परफॉर्म केलं होतं. तसेच अर्जीत सिंह यानेही आपल्या आवाजाने मनं जिंकली होती.