आंद्रे रसेल याने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ठोकलं सिक्सचं द्विशतक
Andre Russell KKR vs SRH | आंद्रे रसेल याने रिंकू सिंह याच्यासोबत निर्णायक भागीदारी केली. आंद्रेने या दरम्यान खास डबल सेंच्युरी पूर्ण केली. आंद्रेने नक्की काय केलं?
1 / 6
केकेआरचा विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज आंद्रे रसेल याने इतिहास रचला आहे. केकेआरच्या 17 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रसेलने कीर्तीमान केला आहे.
2 / 6
आंद्रे रसेल याने 25 बॉलमध्ये 64 धावांची खेळी केली. आंद्रेच्या या खेळीत 7 सिक्सचा समावेश होता. रसेल या 7 सिक्ससह आयपीएलमध्ये वेगवान 200 सिक्स पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.
3 / 6
रसेलने 113 व्या सामन्यातील 99 व्या डावात रसेलने हा कारनामा केला. रसेलने या खेळीदरम्यान 10 वं अर्धशतक ठोकलं.
4 / 6
तसेच आंद्रे रसेल हा आयपीएलमध्ये 200 सिक्स पूर्ण करणारा एकूण नववा तर तिसरा कॅरेबियन फलंदाज ठरला आहे. आंद्रेच्याआधी अशी कामगिरी ख्रिस गेल, रोहित शर्मा, एबी डी व्हीलियर्स, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, किरॉन पोलार्ड आणि सुरेश रैना या 8 जणांनी आयपीएलमध्ये सिक्सचं द्विशतक पूर्ण केलंय.
5 / 6
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
6 / 6
कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.