चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! तीन सामन्यात चमकदार करणारा खेळाडू परतला माघारी
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरुवातीच्या सामन्यात चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स संघ यंदाही चांगली कामगिरी करत आहे. तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवून आपलं आव्हान दाखवून दिलं आहे. मात्र असं असताना पर्पल कॅपचा मानकरी मुस्तफिझुर रहमान घरी परतला आहे.
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्यांदा बंगळुरुला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरात पराभूत केलं आहे. तर दिल्लीकडून 20 धावांनी पराभव सहन करावा लागला आहे. चेन्नईच्या पारड्यात 4 गुण पडले आहेत.
2 / 6
स्पर्धा रंगात आली असताना चेन्नईचा पर्पल कॅपचा मानकरी मुस्तफिझुर रहमान घरी परतला आहे. त्यामुळे चेन्नई संघाला स्पर्धेदरम्यान धक्का बसला आहे. 5 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुस्तफिझुर रहमान नसेल.
3 / 6
8 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. तिथपर्यंत मुस्तफिझुल रहमान परतेल की नाही याबाबत साशंकता आहे. मुस्तफिझुरने व्हिसासाठी मायदेशी परतला आहे.
4 / 6
आगामी टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेचा व्हिसा घ्यावा लागणार आहे. यासाठी त्याला तातडीने बांगलादेशला जावं लागलं आहे. आता त्याचं व्हिसाचं काम झाल्यावरच तो परतेल. त्यामुळे कधी येईल याबाबत स्पष्टता नाही. दुसरीकडे, 14 एप्रिलपर्यंत परतला तर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खेळू शकेल.
5 / 6
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुस्तफिझूर रहमान अव्वल स्थानी आहे. मुस्तफिझुरने 3 सामन्यांत एकूण 7 विकेट घेतल्या आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
6 / 6
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुस्तफिझूर रहमान उपलब्ध नसल्याने चेन्नईकडे एक पर्याय आहे. मोईन अलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.