IPL 2024 | सीएसकेमध्ये दुखापतग्रस्तांची फौज, ओपनर म्हणून कोण, बॉलिंगची जबाबदारी कुणावर?
IPL 2024 Csk | चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षी फायनलमध्ये अखेरच्या चेंडूवर गुजरात विरुद्ध सनसनाटी विजय मिळवला. यंदा चेन्नई 17 व्या मोसमातील सलामीचा सामना हा आरसीबी विरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधी कॅप्टन धोनीच्या नेतृत्वात खेळणारी सीएसके टीम अडचणीत सापडली आहे. आता धोनी कॅप्टन म्हणून अडचणीतून कसा मार्ग काढतो, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.