IPL 2024, CSK vs LSG : चेन्नई सुपर किंग्ससाठी जे धोनीला जमलं नाही ते ऋतुराज गायकवाडने करून दाखवलं
आयपीएल 2024 स्पर्धेत 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 210 धावा केल्या. यात कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीचा समावेश आहे.
1 / 5
ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्ससाठी शतक ठोकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. ऋतुराज गायकवाडने 56 चेंडूत शतक पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 12 चौकार आमि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावा केल्या. या स्पर्धेतील हे आठवं शतक आहे.
2 / 5
ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. चेन्नईकडून शेन वॉटसन आणि मुरली विजय यांनीही प्रत्येकी दोन शतके ठोकली आहेत. टी20 क्रिकेट करिअरमध्ये ऋतुराज गायकवाडने 29 अर्धशतकं आणि 6 शतकं ठोकली आहेत.
3 / 5
चेन्नई सुपर किंग्ससाठी शतक ठोकणारा सातवा फलंदाज आहे. ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्ससाठी दुसरं शतक ठोकलं आहे. शेन वॉटसन आणि मुरली विजयनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज आहे.
4 / 5
ऋतुराज गायकवाडने यापूर्वी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिलं शतक ठोकलं होतं. 2021 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.मुरली विजय 2, शेन वॉटसन 2, ऋतुराज गायकवाड 2, मायकल हस्सी 1, ब्रेंडन मॅकलम 1, सुरेश रैना 1 आणि अंबाती रायुडू 1 शतक ठोकलं आहे.
5 / 5
ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी चौथ्या गड्यासाठी 104 धावांची भागीदारी केली. यापूर्वी एमएस धोनी आणि एस बद्रीनाथ यांनी 2010 मध्ये कोलकात्याविरुद्ध नाबाद 109 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर धोनी-डेविड हस्सी या जोडीने चौथ्या गड्यासाठी 2014 मध्ये हैदराबाद विरुद्ध नाबाद 108 धावांची भागीदारी केली होती.