IPL 2024 : मायानगरी मुंबईत स्वत:चं घर, पृथ्वी शॉ याची स्वप्नपूर्ती, पाहा खास फोटो
Prithvi Shaw New House : स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यातही मुंबईत घर घेणं म्हणजे स्टेटस. क्रिकेटर पृथ्वीचंही मुंबईत घर असावं असं स्वप्न होतं. पृथ्वीचं ते स्वप्न अखेर सत्यात उतरलंय.
1 / 6
पृथ्वी शॉ आयपीएलच्या 17 व्या हंगामात दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळतोय. पृथ्वीने या मोसमात आतापर्यंत 3 सामन्यात 1 अर्धशतक ठोकलंय. पृथ्वीने हे एकमेव अर्धशतक मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियम या आपल्या घरच्या मैदानात ठोकलंय.
2 / 6
पृथ्वी आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान नव्या घरात शिफ्ट झाला आहे. पृथ्वीने मायानगरी आणि स्वप्ननगरी मुंबईत स्वत:चं घरं घेतलंय.
3 / 6
पृथ्वीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. पृथ्वीच्या घराचे फोटो व्हायरल झाले आहेत.
4 / 6
पृथ्वीचं अनेक वर्षांचं स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं आहे. पृथ्वी या फोटोंमध्ये आनंदी दिसत आहे.
5 / 6
पृथ्वीच्या घराची किंमत ही काही कोटींच्या घरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या या नव्या घराची किंमत ही 16 कोटी 50 लाख असल्याचं म्हटलं जात आहे.
6 / 6
दरम्यान पृथ्वीला दिल्लीने या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात संधी दिली नाही. मात्र पृथ्वीने संधी मिळाल्यानंतर दिल्लीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. पृथ्वी दिल्लीसाठी ओपनिंग करतो. पृथ्वीकडून या हंगामात चमकदार कामगिरीची अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे.