IPL 2024 DC vs KKR : कोलकात्याच्या सुनील नरीनचा धुमधडाका, दिल्लीच्या गोलंदाजांना फोड फोड फोडलं
आयपीएल 2024 स्पर्धेतील 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात कोलकात्याच्या सुनील नरीनचा धुमधडाका पाहायला मिळाला. अवघ्या 21 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तसेच कोलकात्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकात नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत कोलकात्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. ठरल्याप्रमाणे कोलकात्याने आक्रमक खेळीसाटी सुनील नरीनला मैदानात पाठवलं. त्याने दुसऱ्यांदा हा विश्वास सार्थकी लावला.
2 / 6
सुनील नरीनने 21 चेंडूत सुनील नरीन 50 धावा ठोकल्या. त्यानंतरही आक्रमक खेळी सुरुच ठेवली. गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्यामुळे कोलकात्याचे गोलंदाज हतबल झाल्याचे दिसून आलं.
3 / 6
सुनील नरीनने 39 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने विकेटच्या मागे झेल घेतला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला.पण तिथपर्यंत टीमने 12.3 षटकात 164 धावा केल्या होत्या.
4 / 6
आयपीएलमध्ये 1-6 षटकात सर्वोत्तम स्ट्राइक रेट आता सुनील नरीनच्या नावावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट 176 इतका स्ट्राईक रेट आहे. त्यानंतर यशस्वी जयस्वाल 152, पृथ्वी शॉ 146 आणि वीरेंद्र सेहवाग 145 इतका स्ट्राईक रेट आहे.
5 / 6
अंगरीश रघुवंशीनेही धडाकेबाज अर्धशतकी केली. त्याने 25 चेंडूत 50 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
6 / 6
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती