IPL 2024 : पंजाब विरुद्धच्या सामन्यात फाफ या 2 खेळाडूंना वगळणार! वाचा कशी असेल प्लेइंग 11 ते
आयपीएल 2024 स्पर्धेतील सहावा आणि दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यातून बंगळुरु स्पर्धेत कमबॅक करण्याची धडपड करेल. पहिल्या सामन्यात बंगळुरुला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यासाठी पंजाबविरुद्धच्या सामन्यात फाफ काही बदल करण्याची शक्यता आहे.
1 / 6
आयपीएलच्या 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. पंजाब विजयाची कायम ठेवण्यासाठी, तर बंगळुरु विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी प्रयत्न करेल.
2 / 6
चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुला 6 विकेट्सने पराभव सहन करावा लागला होता. तर पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात दिल्लीला 4 गडी राखून पराभूत केलं होतं. सध्या गुणतालिकेत बंगळुरु नवव्या, तर पंजाब तिसऱ्या स्थानावर आहे.
3 / 6
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बंगळुरुच्या गोलंदाजीतील कमकुवत बाजू समोर आली होती. त्यामुळे आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. बंगळुरुतील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. त्यामुळे अनुभवी गोलंदाजीची गरज आहे.
4 / 6
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ महागडा ठरला होता. त्याने 3.4 षटकात 38 धावा दिल्या होत्या. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी लॉकी फर्ग्युसनला संधी मिळू शकते.
5 / 6
आरसीबीच्या फलंदाजीतही बदल अपेक्षित आहे. सध्या रजत पाटिदार खराब फॉर्मात आहे. त्यामुळे त्याला आज डावललं जाण्याची शक्यता आहे. पहिल्याच सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. त्याच्या जादी सुयश प्रभूदेसाई किंवा महिपाल लुमरूरला संधी मिळू शकते.
6 / 6
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी आरसीबी संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, लकी फर्ग्युसन, मयंक डागर, मोहम्मद सिराज.