IPL 2024 : विराट कोहलीने शतक झळकावलं आणि संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं, असं किती वेळा माहिती आहे का?
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या वाटेला चौथा पराभव आला आहे. राजस्थान रॉयल्सने 6 गडी राखून बंगळुरुचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने शतकं ठोकलं. मात्र त्याची ही खेळी वाया गेली. असं एक दोनदा नाही तर तिसऱ्यांदा झालं आहे.
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत विराट कोहलीने आठवेळा शतक ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 17 व्या पर्वातील पहिलं शतक विराट कोहलीने झळकावलं आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली.
2 / 6
विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने 20 षटकात 3 गडी गमवून 183 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावा दिल्या. पण विराट कोहलीचं शतकं जोस बटलरच्या खेळीपुढे व्यर्थ गेलं. कारण हा सामना 5 चेंडू आणि 6 गडी राखून राजस्थानने जिंकला.
3 / 6
आयपीएलमध्ये विराट कोहलीने एकूण आठ शतकं झळकावली आहेत. यात आरसीबीने पाच वेळा विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात शतकी खेळी करून पराभव पचवाव लागला आहे.
4 / 6
आयपीएल 2016 मध्ये विराट कोहलीने एकूण 4 शतकं झळकावली होती. पण गुजरात लायन्सविरुद्ध 63 चेंडूत 100 धावा करूनही आरसीबीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
5 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेतही विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्याने 61 चेंडूत 101 धावा केल्या होत्या. मात्र आरसीबीला पराभव सहन करावा लागला.
6 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 72 चेंडूत नाबाद 113 धावा केल्या. मात्र शतकी खेळीनंतरही बंगळुरुच्या पदरी पराभव पडला.