IPL 2024 : जोस बटलरच्या शतकी खेळीनंतर जुना विक्रम मोडीत, काय केलं ते वाचा
आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकात्याच्या ईडन गार्डनवर दोन शतकं पाहण्याची अनुभूती आली. जोस बटलरचं शतक सुनील नरीनच्या शतकावर भारी पडलं. जोस बटलरने शतकी खेळीसह संघाला विजय मिळवून दिला. तसचे एक खास विक्रम नोंदवला आहे.
1 / 6
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विक्रम करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तर जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. आता जोस बटलरने दोन शतकांसह मोठा विक्रम नोंदवला आहे. कोहली-ख्रिस गेलला मागे टाकलं आहे.
2 / 6
राजस्थान रॉयल्सच्या जोस बटरलने शतकी खेळीसह एक विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर होता.
3 / 6
ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 6 शतकं झळकावली आहेत. आरसीबी-पंजाबसाठी खेळताना त्याने ही शतकं झळकावली होती. शतकी खेळीसह सर्व सामने जिंकले आहेत.
4 / 6
विराट कोहलीने आयपीएलमध्ये 8 शतकं ठोकली आहेत. पण आरसीबीला फक्त 5 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
5 / 6
जोस बटलरने आयपीएलमधलं 7वं शतक ठोकलं आहे. या सातही शतकांवेळी संघांना विजय मिळाला आहे. त्यामुळे ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघाला आहे.
6 / 6
जोस बटलरच्या नावावर सात शतकं असून दुसऱ्या स्थानावर आहे. बटलरने आणखी एक शतक ठोकल्यास विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. आता ही बरोबरी येत्या सामन्यात जोस बटलर करतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.