केकेआरचा हिरो IPL 2024 मध्ये झिरो, टी 20 वर्ल्ड कपआधी फ्लॉप
T20 World Cup 2024 : रिंकू सिंहने आयपीएलच्या 16 व्या मोसमात 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून हवा केलेली. त्याच जोरावर त्याला टीम इंडियात संधी मिळाली. मात्र टी 20 वर्ल्ड कपच्या तोंडावर रिंकूला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
1 / 6
बीसीसीआय निवड समितीने काही दिवसांपू्र्वी आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघांची घोषणा केली. निवड समितीने रिंकू सिंह याला राखीव म्हणून संधी दिली.
2 / 6
रिंकू सिंहला आयपीएलच्या 17 व्या मोसमात काही खास करता आलेलं नाही. रिंकूने या हंगामातील 10 सामन्यांमध्ये 125 धावा केल्या.
3 / 6
रिंकू सिंहचा या हंगामातील 26 हा सर्वोच्च स्कोअर राहिला आहे. रिंकूला 10 पैकी 4 सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
4 / 6
रिंकू सिंहने आयर्लंड विरुद्ध टी 20 पदार्पण केलं होतं. रिंकू त्यांनतर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धही खेळला.
5 / 6
रिंकूने त्याच्या टी 20 कारकीर्दीतील 15 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. रिंकूने या सामन्यांमध्ये 873 धावा केल्या आहेत.
6 / 6
तसेच रिंकूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 42 सामन्यांमध्ये 356 धावा केल्या आहेत. मात्र त्याला या हंगामात धमाका करता आलेला नाही. तसेच रिंकूची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आलेली नसली तरी 25 मे पर्यंत संघात बदल करता येणार आहे. त्यामुळे 25 मे पर्यंत काहीही शक्य आहे.