IPL 2024, KKR vs RR : सुनील नरीनचा ईडन गार्डनवर धूमधडाका, स्पर्धेतील चौथं आणि वैयक्तिक पहिलं शतक ठोकलं
आयपीएल स्पर्धेत सुनील नरीनचा फॉर्म कायम आहे. याचं दर्शन राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दिसलं. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सुनील नरीनने शतक ठोकलं. स्पर्धेतील हे चौथं शतक आहे. यापूर्वी विराट कोहली, जोस बटलर आणि रोहित शर्मा यांनी शतक ठोकलं होतं. अवघ्या 49 चेंडूत सुनील नरीनने हे शतक ठोकलं आहे.