IPL 2024 : विजेता संघावर होणार पैशांचा पाऊस, उपविजेताही मालामाल, कुणाला किती रक्कम मिळणार?

| Updated on: May 13, 2024 | 6:19 PM

IPL 2024 Prize Money : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील महाअंतिम सामना हा 26 मे रोजी होणार आहे. जाणून घ्या विजेत्या-उपविजेत्या संघाला प्राईज मनी म्हणून किती रक्कम मिळणार?

1 / 6
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील प्लेऑफ सामन्यांना 21 मे पासून सुरुवात होणार आहे.  तर अंतिम सामना हा चेपॉक स्टेडियमवर 26 मे रोजी होणार आहे. आयपीएल  विजेत्या संघावर पैशांचा पाऊस होणार आहे. तसेच उपविजेत्या संघासह इतर संघांनाही चांगली रक्कम मिळणार आहे.

2 / 6
रिपोर्ट्सनुसार, आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रुपये बक्षिस मिळणार आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या तुलनेत प्राईज मनीत कित्येक पटीने वाढ करण्यात आली आहे.

3 / 6
तसेच उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये प्राईज मनी म्हणून मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने गेल्या हंगामात अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं.

4 / 6
एकूण प्राईज मनीचा आकडा हा 46 कोटी 50 लाख रुपये इतका आहे. विजेता,उपविजेत्यानंतर तिसऱ्या स्थानी असलेल्या संघाला 7 कोटी रुपये मिळणार आहे.

5 / 6
चौथ्या स्थानी असणाऱ्या संघाला 6 कोटी 50 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूलाही घसघशीत रक्कम देण्यात येणार आहे.

6 / 6
ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्याला प्रत्येकी 15 लाख रुपये मिळणार आहेत. एका हंगामात सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला ऑरेंज आणि पर्पल कॅप देण्यात येते.