IPL 2024 : आयपीएलचं 17 वं पर्व या तारखेपासून सुरु होणार! लोकसभा निवडणुकीत असं असेल व्यवस्थापन

| Updated on: Jan 10, 2024 | 4:14 PM

आयपीएल 2024 अर्थात 17 व्या पर्वाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेपूर्वी मिनी लिलावही पार पडला. त्यात कोट्यवधींची उधळण करून खेळाडूंची खरेदीही करण्यात आली आहे. आता क्रीडाप्रेमींना आयपीएल वेळापत्रकाची उत्सुकता लागून आहे.असं असताना बीसीसीआयच्या सूत्रांकडून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यात आयपीएल आणि वुमन्स प्रीमियर लीगच्या तारखांबाबत खलबतं झाली आहेत.

1 / 6
आयपीएल 2009 आणि 2014 साली जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा आयपीएलचं आयोजन देशाबाहेर करण्यात आलं होतं. पण यंदा ही स्पर्धा भारतातच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता आयपीएल व्यवस्थापन कशा पद्धतीने नियोजन करते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

2 / 6
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा कुठे आणि कधी आयोजित करावी असा पेच होता. आता ही स्पर्धा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

3 / 6
लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदात 8 ते 9 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकांचा अंदाज यासाठी घेतला गेला आहे. त्यामुळे वेळापत्रक तयार केलं जात आहे. ज्या टप्प्यात निवडणुका असतील तेथे एकतर सामने संपलेले असतील किंवा मतदान झाल्यानंतर तेथे सामने होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

4 / 6
आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी देशातील 12 स्टेडियमची निवड केली जाईल. तत्पूर्वी वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

5 / 6
आयपीएल 2009 आणि 2014 साली जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा आयपीएलचं आयोजन देशाबाहेर करण्यात आलं होतं. पण यंदा ही स्पर्धा भारतातच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता आयपीएल व्यवस्थापन कशा पद्धतीने नियोजन करते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

आयपीएल 2009 आणि 2014 साली जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा आयपीएलचं आयोजन देशाबाहेर करण्यात आलं होतं. पण यंदा ही स्पर्धा भारतातच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता आयपीएल व्यवस्थापन कशा पद्धतीने नियोजन करते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

6 / 6
आयपीएलच्या 16 व्या पर्वाचं आयोजन 12 शहरांमध्ये करण्यात आलं होतं. गतवर्षीप्रमाणे यंदाही एकूण 10 संघ असून सर्व 10 संघ होम आणि अवे पद्धतीने सामने खेळतील.