IPL 2024 MI | मुंबई इंडियन्सनचे 6 गेमचेंजर विदेशी खेळाडू, एकाने सलग 3 सिक्स ठोकून जिंकवलंय

| Updated on: Mar 15, 2024 | 7:08 PM

IPL 2024 MI Foreign Players | मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. मुंबईचा सलामीचा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या गोटात एकूण 7 खेळाडू आहेत. त्यापैकी 6 खेळाडूंची कामगिरी आपण जाणून घेऊयात.

1 / 9
आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेली टीम यंदाच्या 17 व्या मोसमात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. मुंबई इंडियन्स टीममध्ये 25 खेळाडू आहेत. त्यापैकी 7 खेळाडू हे विदेशी आहेत. या 7 पैकी 6 विदेशी खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत.  6 खेळाडूंमधून मुंबईने 3  खेळाडू ऑक्शनमधून खरेदी केले आहेत. दोघांना कायम ठेवलंय. तर एकाला ट्रेड केलंय.

2 / 9
मुंबई इंडियन्सने 2023 मध्ये झालेल्या मिनी  ऑक्शनमधून 3 खेळाडू खरेदी केले. यामध्ये गेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका), मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) आणि दिलशान मधुशंका (श्रीलंका) या तिघांचा समावेश आहे.

3 / 9
मुंबई इंडियन्सने गेराल्ड कोएत्झी याच्यासाठी 5 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.  आयपीएल 2021 स्पर्धेत इंग्लंडचा ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोन याच्या दुखापतीनंतर गेराल्डला राजस्थान रॉयल्सने आपल्यात घेतलं. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यानंतर अधेमधे त्याचा काहीच पत्ता नव्हता. मात्र त्यानंतर गेराल्डने भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत धमाका केला. गेराल्डने दक्षिण आफ्रिकेसाठी 8 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या. आता गेराल्ड आयपीएलमध्ये मुंबईसाठी कशी कामगिरी करतो, याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.

4 / 9
अफगाणिस्तानचा ऑलराउंडर 39 वर्षीय मोहम्मद नबी याला मुंबईने ऑक्शनमधून 1 कोटी 50 लाख रुपये मोजून घेतलं.  नबीने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळला आहे. मोहम्मद नबीने आयपीएलमधील 17 सामन्यांमध्ये  180 धावा केल्या आहेत तसेच 13 विकेट्स घेतल्या आहेत. आता नबीच्या अनुभवाचा मुंबईला किती फायदा होतो, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

5 / 9
श्रीलंकेसाठी 1 कसोटी, 23 एकदिवसीय आणि 14 टी 20 सामने खेळणारा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका याला आयपीएलचा शून्य अनुभव आहे. मुंबईने दिलशानसाठी 4 कोटी 60 लाख रुपयात आपल्यात घेतलं. आता मधुशंका मुंबईकडून खेळताना कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

6 / 9
पलटणने डेवाल्ड ब्रेव्हिस (दक्षिण आफ्रिका) आणि टीम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया) या दोघांना कायम राखलंय. मुंबईने या दोघांना करारमुक्त न करता विश्वास दाखवला. या दोघांबाबत जाणून घेऊयात.

7 / 9
दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिस याला आयपीएलचा तसा फार अनुभव नाही. मात्र तो सामना एकहाती फिरवण्याची क्षमता ठेवतो. डेवाल्डचं मुंबईसातलं हे तिसरं वर्ष आहे. डेवाल्डला मुंबईसाठी आयपीएलमध्ये तडाखा दाखवता आला नाही.   डेवाल्ड आयपीएलमध्ये फक्त 7 सामने खेळले आहेत. डेवाल्डने या 7 सामन्यांमध्ये  161 धावा केल्या आहेत. तर 1 विकेटही घेतली आहे.  मात्र त्याच्या तडाखेदार कामगिरीसाठी त्याला 'बेबी एबी' असं म्हटलं जात. डेवाल्डने दक्षिण आफ्रिका टी 20 लीग स्पर्धेत 35 चेंडूत शतक ठोकत एकूण 57 बॉलमध्ये 162 धावांची विस्फोटक खेळी केली होती.

8 / 9
ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिड याने 16 व्या हंगामात 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध आपला झंझावात दाखवून दिला होता. मुंबईला 20 व्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज असताना डेव्हीडने सलग 3 खणखणीत सिक्स ठोकून विजयी केलं होतं. टीमने तेव्हा 14 बॉलमध्ये नाबाद 45 धावांची खेळी केली होती. तेव्हापासून टीमला मुंबईचा दुसरा पोलार्ड असं म्हटलं जातं. यंदाही टीमकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

9 / 9
मुंबई इंडियन्सने विंडिजचा अष्टपैलू रोमरियो शेफर्ड याला लखनऊ सुपर जायंट्सकडून 50 लाख मोजून ट्रेड विंडोद्वारे आपल्या ताफ्यात घेतलं. शेफर्डने विंडिजचं 31 वनडे आणि 35 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच शेफर्डने आयपीएलमध्ये 4 सामने खेळले आहेत. सनरायजर्स हैदराबादने आयपीएल 2022 ऑक्शनमधून 7 कोटी 75 लाख रुपये मोजले. तेव्हा शेफर्डला 3 सामनेच खेळायची संधी मिळाली. त्यानंतर लखनऊने 2023 मध्ये त्याला 50 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं होतं.