Rohit Sharma 17 व्या हंगामासाठी तयार, 3 विक्रम करण्यासाठी सज्ज

| Updated on: Mar 24, 2024 | 6:46 PM

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2024 : रोहित शर्मा 2013 नंतर पहिल्यांदाच कर्णधार नाही, तर एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. रोहितच्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड्स आहेत.

1 / 6
कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा 17 व्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. रोहितने सलामीच्या सामन्याआधी जोरदार सराव केला.

2 / 6
मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या या नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहे. मुंबईचा पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होणार आहे.

3 / 6
रोहितला या हंगामात 3 रेकॉर्ड्स करण्याची संधी आहे. रोहित शर्मा याचा हे 3 रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे. ते रेकॉर्ड काय ते जाणून घेऊयात.

4 / 6
रोहित शर्मा याला टी 20 क्रिकेटमध्ये 500 सिक्सचा टप्पा गाठण्यासाठी 13 सिक्सची गरज आहे. रोहितच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये 487 सिक्स आहेत. रोहितने या हंगामात 13 सिक्स पूर्ण केल्यास तो टी 20 मध्ये 500 सिक्स करणारा पहिला भारतीय ठरेल.

5 / 6
रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 243 पैकी 198 सामने मुंबईसाठी खेळले आहेत. त्यामुळे रोहित दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताच मुंबईसाठी 200 मॅच खेळणारा पहिला खेळाडू ठरेल.

6 / 6
रोहितला आयपीएलमध्ये कॅचचं शतक पूर्ण करण्यासाठी 2 कॅचची गरज आहे. रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये 98 कॅचेसची नोंद आहे.