चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंह धोनी याने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी टी20 क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 धावा करताच हा विक्रम प्रस्थापित केलं आहे.
चेन्नई सुपर किंग्साठी चॅम्पियन लीग टी20 आणि आयपीएलमध्ये मिळून 5000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी ही कामगिरी सुरेश रैनाने केली होती. महेंद्रसिंह धोनी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा सातवा फलंदाज आहे.
महेंद्रसिंह धोनीने आयपीएल करिअरची सुरुवात 2008 पासून केली होती. या फ्रेंचायसीसाठी आयपीएल आणि चॅम्पियन लीग टी20 खेळत 250 मॅच खेळला आहे.
महेंद्रसिंह धोनीने जवळपास 39च्या सरासरीने 5 हजार धावा केल्या आहेत. यात नाबाद 84 ही सर्वोत्तम खेळी आहे. तसेच 23 अर्धशतकं ठोकली आहेत. महेंद्रसिंह धोनी 2016-2017 हे दोन सिझन खेळला नाही. कारण या कालावधीत फ्रेंचायसीवर बंदी घालण्यात आली होती.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये जेतेपद मिळवलं आहे. (सर्व फोटो- IPL/BCCI)