चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी धुव्वा उडवला. यासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर मुंबई इंडियन्सला फटका बसला आहे. असं असलं तरी मुंबईच्या रोहित शर्माने एक कारनामा केला आहे.
रोहित शर्माने 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. रोहित शर्माचं हे आयपीएलमधलं दुसरं शतक आहे. यापूर्वी 2012 मध्ये त्याने शतक ठोकलं होतं. म्हणजेच 12 वर्षानंतर पुन्हा शतकी खेळी केली आहे. रोहित शर्माचं टी20 क्रिकेटमधील आठवं शतक आहे.
रोहित शर्माने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर 63 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. मुंबई इंडियन्ससाठी दोन शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या टी20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. सुरेश रैनाला त्याने मागे टाकलं आहे.
टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा 500 षटकार मारणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने 431 टी20 सामन्यात 501 षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये 248 सामन्यात 272 षटकार, 151 टी20 सामन्यात 190 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा चॅम्पियन लीग आणि देशांतर्गत टी20 सामनेही खेळला आहे.