MI vs RCB : पलटणचा विषयच हार्ड, आयपीएलमध्ये चौथ्यांदा धमाका, अद्याप कुणालाच जमलं नाय

| Updated on: Apr 12, 2024 | 11:48 PM

IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी केलीय, जे अद्याप इतर संघांना कधीच जमलं नाहीय. जे इतरांसाठी अशक्य आहे ते पलटणने चौथ्यांदा करुन दाखवलंय. नक्की काय केलंय? जाणून घ्या.

1 / 5
आयपीएलच्या 17 व्या हंगामात सलग 3 पराभवानंतर मुंबई इंडियन्स विजयी ट्रॅकवर परतली आहे. मुंबईने 11 एप्रिलला आरसीबीवर मात करत या हंगामातील एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला. मुंबईने या विजयासह अशी कामगिरी केली जी अजून कुणाला जमली नाही.

2 / 5
मुंबईचा कीर्तीमान हा 190 पेक्षा अधिक धावांचं आव्हान जलद पूर्ण करण्याबाबत आहे.  मुंबईशिवाय  कोणत्याही टीमला एकदाही 190 धावांचं आव्हान हे  3 पेक्षा अधिक ओव्हर ठेवून पूर्ण करता आलेलं नाही. मात्र मुंबईची ही तब्बल चौथी वेळ ठरली आहे.

3 / 5
मुंबईने आरसीबी विरुद्ध 197 धावांचं आव्हान हे 27 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 15.3 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठलं. मुंबईची ही चौथी वेळ ठरली.

4 / 5
आरसीबी विरुद्धचा विजय मुंबईचा तिसरा वेगवान विजय ठरला आहे. मुंबईने याआधी आरसीबी विरुद्ध गत हंगामात 16.3 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं होतं.

5 / 5
मुंबई इंडियन्सने 190 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी आणि वेगवान पाठलाग हा 2014 साली राजस्थान रॉयल्स विरुद्ध केला होता. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला होता. मुंबईने 14.4 ओव्हरमध्ये या धावा केल्या होत्या. तर 2017 मध्ये पंजाब विरुद्ध इंदूरमध्ये 15.3 ओव्हरमध्ये 190 पेक्षा अधिक विजयी धावांचा टप्पा गाठला होता. (सर्व फोटो सौजन्य : पीटीआय)