MI vs RCB : वानखेडेवर रोहित शर्माचं शतक! विजयकुमार विशकला षटकार मारून साजरी केली ‘सेंच्युरी’
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 54 चेंडूत शतकी भागीदारी केली. तसेच रोहित शर्माने वानखेडेवर अनोखं शतकंही पूर्ण केलं. नेमकं काय केलं ते जाणून घ्या
1 / 5
आयपीएल 2024 स्पर्धेतील 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईसमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली. इशान किशनने यावेळी झटपट अर्धशतक पूर्ण केलं. तसेच रोहित शर्माने खास आगळंवेगळं शतक ठोकलं. (Photo- IPL/BCCI)
2 / 5
रोहित शर्माने विजयकुमार विशक याला षटकार ठोकताच त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. रोहित शर्माने षटकारांचं शतक ठोकलं आहे. वानखेडेवर षटकारांचं शतक ठोकण्याचा विक्रम केला. (Photo- IPL/BCCI)
3 / 5
रोहित शर्माने आपल्या डावातील तिसरा षटकार ठोकताच हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वानखेडेवर षटकारांचं शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo- IPL/BCCI)
4 / 5
टी20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल, कीरोन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि कॉलिन मुनरो यांनी 500 षटकार ठोकले आहे. रोहित शर्माने 431 सामन्यात 497 षटकार ठोकले आहे. आता चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तीन षटकार ठोकताच 500 षटकार नावावर होणार आहेत. ख्रिस गेल 1056 षटकार, किरोन पोलार्ड 860 षटकार, आंद्रे रसेल 678 षटकार, कॉलिन मुनरो याच्या नावावर 548 षटकार आहेत. (Photo- IPL/BCCI)
5 / 5
रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या 248 आयपीएल सामन्यात 266 षटकार आणि 151 टी20 सामन्यात 190 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्मा मुंबईसाठी चॅम्पियन लीग आणि देशांतर्गत टी20 सामनेही खेळला आहे. (Photo- IPL/BCCI)