IPL 2024 | हार्दिककडे मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी, युवराज सिंह काय म्हणाला?

| Updated on: Mar 14, 2024 | 6:03 PM

IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी अनेक संघांनी टीममध्ये बदल केले. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून हार्दिक पंड्याला नेतृत्व दिलं. या निर्णयावरुन आता युवराज सिंग याने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

1 / 5
आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने मोठा निर्णय घेत रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं. रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. पलटणने हार्दिकला गुजरात टायटन्समधून ट्रेड केलं. हार्दिकने गेल्या 2 हंगामात गुजरात टीमचा कॅप्टन होता. हार्दिकने पहिल्याच मोसमात गुजरातला विजयी केलं. तर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मुंबईच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावरुन टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंह याने प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवण्याच्या निर्णयाबाबत युवराजने असमाधान व्यक्त केलंय. रोहितला आणखी एक हंगाम कर्णधार म्हणून ठेवायला हवं होतं असं मत युवराजने मांडलं.

3 / 5
"रोहित शर्मा 5 वेळचा आयपीएल चॅम्पियन कॅप्टन आहे. त्याला हटवणं मोठा निर्णय होता. रोहितला आणखी हंगामासाठी कॅप्टन म्हणून ठेवायला हवं होतं. तर हार्दिकला उपकर्णधारपदाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती", असं युवराज म्हणाला.

4 / 5
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 2013 साली पहिल्यांचा कॅप्टन केलं. रोहितनेही मुंबईला आपल्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर रोहितने 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.

5 / 5
तसेच हार्दिकची कर्णधार म्हणून आकडेवारी दमदार आहे. हार्दिकने पहिल्याच हंगामात 2022 साली गुजरातला ट्रॉफी जिंकून दिली होती. तर 2023 मध्ये अंतिम फेरीत चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.