मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नावावर नकोसा विक्रम, 16 वर्षांनी पुन्हा असं घडलं
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात एकदम वाईट झाली आहे. सुरुवातीचे दोन सामने गमवल्याने कर्णधार हार्दिक पांड्यावर टीकेची झोड उठली आहे. असं असताना हार्दिक पांड्याच्या नावावर आता एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 2008 नंतर मुंबई इंडियन्स संघासोबत असं घडलं आहे.
1 / 7
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या संघाची स्थिती सुरुवातीलाच इतकी वाईट होईल याची कल्पनाच नव्हती.
2 / 7
रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे. फ्रेंचायसीच्या या निर्णयामुळे रोहित शर्माचे चाहते नाराज झाले होते. आता सुरुवातीचे दोन सामने गमवल्याने आगीत तेल ओतल्यासारखं झालं आहे. मुंबई इंडियन्सची सध्याची स्थिती पाहून चाहते संतापले आहेत.
3 / 7
हरभजन सिंग, शेन पोलॉक, सचिन तेंडुलकर, डीजे ब्राओ, सचिन तेंडुलकर, रिकी पॉटिंग, रोहित शर्मा, किरोन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि आता हार्दिक पांड्याच्या हाती नेतृत्व आहे. हार्दिक पांड्या हा मुंबईचा नववा कर्णधार आहे.
4 / 7
सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याच्या खात्यात नकोसा विक्रमाची नोंद झाली आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने दोन सामने गमावले आहेत. फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून पंड्याने आयपीएल हंगामातील पहिले 2 सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
5 / 7
मुंबई इंडियन्स संघ 2008 च्या आयपीएल हंगामात हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली खेळला होता. मात्र या मोसमातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आयपीएलच्या सर्व पर्वात पहिला सामना गमवल्यानंतर विजयी ट्रॅकवर आले होते.
6 / 7
हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून नाही तर खेळाडू म्हणूनही खराब कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात 30 धावा देऊन एकही विकेट घेता आली नाही. तर फलंदाजीत फक्त 11 धावा करता आल्या.
7 / 7
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला त्याच्या 4 षटकात 46 धावा दिल्या आणि फक्त 1 विकेट घेतली. 278 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक 20 चेंडूत 24 धावा करून बाद झाला.