IPL 2024 : मुंबई इंडियन्स विजयाच्या ट्रॅकवर, पण हार्दिक पांड्याचं टेन्शन अजूनही तसंच

| Updated on: Apr 11, 2024 | 3:43 PM

आयपीएल स्पर्धेतील सलग तीन सामने गमवल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या टीकेचा धनी ठरला होता. मात्र चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं आणि मुंबईने पहिला विजय मिळवला. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ समोर आहे. मुंबई इंडियन्स दुसऱ्या विजयासाठी, तर आरसीबी विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी आतुर आहे. पण हार्दिक पांड्याला एक चिंता सतावत आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात एकदम निराशाजनक राहिली आहे. पहिले तीन सामने गमवल्यानंतर प्लेऑफसाठी मुंबईला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. चौथ्या सामन्यात मुंबईने दिल्लीला पराभूत केलं. मात्र हा विजयी ट्रॅक कायम ठेवावा लागणार आहे. (Photo : IPL/BCCI)

2 / 6
मुंबई इंडियन्सचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यामुळे मुंबईसमोर एक तगडं आव्हान असणार आहे. वानखेडे मैदानाचा परीघ छोटा असल्याने धावांचा वर्षाव होईल याच शंका नाही. पण हार्दिक पांड्याचं टेन्शन काही वेगळंच आहे. (Photo : IPL/BCCI)

3 / 6
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात हवी तशी छाप सोडू शकला नाही. इतकंच काय तर दिल्ली विरुद्धची हार्दिकची खेळी पराभवाचं कारण ठरू शकली असती. त्यामुळे हार्दिक पांड्याला आपल्या फॉर्मची सर्वाधिक चिंता असणार आहे. (Photo : IPL/BCCI)

4 / 6
हार्दिकने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात 39,34,24 आणि 11 धावा केल्या आहेत. एकूण चार सामन्यात 138 च्या स्ट्राईक रेटने 108 धावा केल्या आहेत. दोन सामन्यात षटकं टाकली. पण काही प्रभाव पाडू शकला नाही. पहिल्या सामन्यात 3 षटकं टाकून 30 धावा दिल्या. दुसऱ्या सामन्यात 4 षटकं टाकून 46 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. (Photo : IPL/BCCI)

5 / 6
मुंबईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना त्याच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात हार्दिककडून बऱ्याच अपेक्षा आहेत. यासाठी हार्दिकला त्याच्या स्वत:च्या कामगिरीतून संघासाठी सर्वाधिक योगदान देण्याची गरज आहे. (Photo : IPL/BCCI)

6 / 6
मुंबई इंडियन्स संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, थिलकियो शेफर्ड, थिलकिओ शेफर्ड बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका. (Photo : IPL/BCCI)