IPL 2024 : हे 5 स्टार खेळाडू अजूनही संधीच्या प्रतिक्षेत, एक तर गोलंदाजांचा कर्दनकाळ
IPL 2024 : आयपीएलमुळे खेळाडूंना पैसा, प्रसिद्धी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. मात्र काही असेही कॅप्ड खेळाडू आहेत, ज्यांना आतापर्यंत या 17 व्या मोसमात एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही.
1 / 6
आयपीएलच्या 17 व्या मोसमात आता दिवसेंदिवेस चुरस वाढत आहे. काही संघांची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तर काही संघांचं बाहेर होणं निश्चित झालं आहे. अशात 5 दुर्देवी खेळाडू आहेत, ज्यांना अद्याप प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.
2 / 6
विंडिजचा स्टार बॅट्समन कायले मेयर्स लखनऊ सुपर जायंट्सच्या गोटात आहे. मेयर्सला या हंगामात एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. मेयर्सने गेल्या हंगामातील 13 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या होत्या.
3 / 6
न्यूझीलंडचा स्टार ऑलराउंडर ग्लेन फिलिप्स सनरायजर्स हैदराबाद टीममध्ये आहे. ग्लेनला अद्याप संधी मिळालेली नाही.फिलिप्स गेल्या हंगामात हैदराबादकडून 5 सामने खेळला होता.
4 / 6
न्यूझीलंडचा मुख्य स्पिनर मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्समध्ये आहे. मिचेलचा अद्याप प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मिचेलने गेल्या हंगामात 3 सामने खेळले होते.
5 / 6
नवदीप सैनी याला अजून संधीची प्रतिक्षा आहे. सैनी राजस्थान टीममध्ये आहे. सैनीला 2022 आणि 2023 मध्येही फक्त 2-2 सामन्यातच घेतलं होतं.
6 / 6
अफगाणिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन रहमानुल्लाह गुरबाज याने गेल्या हंगामात केकेआरसाठी ओपनिंग केली. मात्र यंदा तो आतापर्यंत उपेक्षितच ठरला आहे.