IPL 2024 : ऑरेंज कॅपचा मानकरी आणि स्टार खेळाडू शुभमन गिल गुजरात टायटन्सला देणार सोडचिठ्ठी? कारण…
आयपीएल 2023 स्पर्धा खऱ्या अर्थाने गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने गाजवली. गेल्या 4 सिझनपासून शुभमन गिल सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. यंदाही ऑरेंज कॅप पटकावून त्याने हे सिद्ध करून दाखवलं आहे.
1 / 12
इंडियन प्रीमियर 2023 स्पर्दा संपल्यानंतर आता आयपीएल 2024 बाबत चर्चा सुरू झाली आहे.
2 / 12
काही फ्रँचायसी पुढील हंगामासाठी स्टार खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. या यादीत शुभमन गिल हे नाव आघाडीवर आहे. गुजरात टायटन्ससाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलने यावेळी एकूण 890 धावा केल्या असून ऑरेंज कॅप पटकावली आहे.
3 / 12
शुभमन गिल गेल्या चार पर्वापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याने आयपीएल 2020 मध्ये 440 आणि 2021 मध्ये 478 धावा, 2022 मध्ये 483 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने 890 धावा केल्या.
4 / 12
गुजरात टायटन्स फ्रँचायसीने शुभमन गिलला ऑफर केलेली रक्कम केवळ 8 कोटी रुपये आहे. गिलचा पगार लीगमधील इतर खेळाडूंच्या तुलनेत खूपच कमी आहे.
5 / 12
मुंबई इंडियन्स फ्रँचायसी इशान किशनला 15.25 कोटी, सीएसके दीपक चहरला 14 कोटी आणि केकेआरने श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रुपये दिले होते.हर्षल पटेलला आरसीबीकडून 10.75 कोटी रुपये मिळत आहेत. शार्दुल ठाकूर 10.75 कोटी, तर आवेश खानला 10 कोटी रुपये घेत आहे.
6 / 12
सलग चार हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलचा पगार अजूनही सिंगल डिजिटमध्येच आहे. त्यामुळे पुढील हंगामात त्याला लिलावात आणण्यासाठी काही फ्रँचायसी प्रयत्न करतील.
7 / 12
पंजाब किंग्ज फ्रँचायसी शुभमन गिलला विकत घेण्यास आधीच उत्सुक आहे. कारण पंजाब संघाला स्टार खेळाडूची गरज आहे. विशेषत: स्थानिक स्टार खेळाडू मिळाल्यास पंजाब किंग्स त्याला जाऊ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
8 / 12
शुभमन गिल हा पंजाबचा क्रिकेटर आहे. त्याला बोलावून नेतृत्व दिले तर संघाची ताकद वाढेल. आयपीएलमध्ये घराच्या संघाचे नेतृत्व करणे ही कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची बाब आहे.
9 / 12
रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे, तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माच्या आधी सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे कर्णधार होते. सौरव गांगुली यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता.
10 / 12
पंजाब किंग्ज फ्रँचायसीचे नेतृत्व यापूर्वी युवराज सिंगकडे होते. त्यामुळे पुढील लिलावात शुबमन गिलच्या प्रवेशासाठी पंजाब किंग्ज उत्सुक आहेत.शुभमन गिलने गुजरात टायटन्स सोडल्यास तो पंजाब किंग्जमध्ये सामील होईल असे म्हणता येईल. कारण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक रकमेत खेळाडू विकत घेण्याचा विक्रम पंजाब किंग्ज फ्रँचायझीच्या नावावर आहे.
11 / 12
2023 च्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्ज फ्रँचायझीने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
12 / 12
फ्रँचायसीने सॅम करनला पुढच्या लिलावापूर्वी रिलीज केले तर 18.50 कोटी रुपये बोली रकमेत जोडले जातील. तसेच शुभमन गिलला तेवढीच रक्कम भरणे पुरेसे आहे. त्यामुळे, पंजाब किंग्ज फ्रँचायसीशी करार म्हणून शुभमन गिलने गुजरात टायटन्स संघ सोडल्यास आश्चर्य वाटू नये.