IPL 2024: आरसीबी आणि सीएसके स्पर्धेत इतक्यांदा भिडले, कोणाचं नाणं खणखणीत? वाचा
CSK vs RCB: आयपीएल 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. पहिल्याच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाचं पारडं जड असेल याची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. आरसीबीला अजून एकदाही जेतेपद जिंकता आलं नाही. तर चेन्नईने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.
1 / 7
आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. दोन्ही फ्रेंचायसी आतापर्यंत 31 वेळा आमनेसामने आले आहेत. तर या पर्वातील ही 32 वी लढत असेल.
2 / 7
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या लढतीचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांची फॅन्स फॉलोईंग जबरदस्त आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
3 / 7
आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघ 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात सीएसकेने 20 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही.
4 / 7
चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर दोन्ही संघ आतापर्यंत 9 वेळा आमनेसामने आले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने 7 सामने जिंकले आहेत तर आरसीबीला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
5 / 7
आरसीबीला स्पर्धेतील पहिला पेपर कठीण असणार आहे. जर आरसीबीने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला तर गुणतालिकेत अव्वल स्थान गाठून पुढे जाण्याचा मार्ग सुकर होत राहील. तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवून जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करता येईल.
6 / 7
आरसीबी संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत, सौरव चौहान, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, आकाश दीप, मनोज भंडागे, टॉम करण, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, सुयश प्रभु, मायदेशी डागर, फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, राजन कुमार, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, रीस टोपले, विजय कुमार वैशाक, यश दयाल.
7 / 7
चेन्नई सुपर किंग्ज संघ: एमएस धोनी (कर्णधार) मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिश पाथीराना, अजिंक्य शेख, शेख राणे, सँटनेर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थिकशन, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अवनीश राव अरावली.