IPL 2024 : आरसीबीच्या लोगोत पाचव्यांदा बदल, आतापर्यंत कशी कात टाकली त्यावर टाका एक नजर
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची झोळी अद्याप रितीच आहे. गेल्या 16 पर्वात आरसीबीच्या पदरी निराशा पडली आहे. आता पुन्हा एकदा आरसीबी संघ जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी संघाने आपल्या जर्सी आणि लोगोत बदल केला आहे. लोगोत बदल करण्याची आरसीबीची ही पाचवी वेळ आहे. बघा आरसीबीच्या लोगोत आतापर्यंत कसा बदल होत गेला ते
1 / 7
आयपीएल 2024 स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्यातून होणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या जर्सीत बदल केला आहे. काळा रंग काढून त्याऐवजी निळ्या रंगाचा वापर केला आहे. तर लोगोतही बदल केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ऐवजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असं नामकरण केलं आहे.
2 / 7
आरसीबीची लोगो बदलण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही चार वेळा लोगो बदल करण्यात आला आहे. आता पाचव्यांदा बदल करून संघ मैदानात उतरणार आहे. चला जाणून घेऊयात आतापर्यंत या लोगोत कसा बदल होत गेला ते..
3 / 7
आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ वरील दिलेल्या लोगोसह उतरला होता. या सिंह या चिन्हापेक्षा नावाला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचं दिसत आहे.
4 / 7
आयपीएल 2009 स्पर्धेत यात किंचितसा बदल केला गेला. लोगो तसाच ठेवला मात्र रंगात बदल केला. या लोगोसह संघाने 7 हंगाम खेळले.
5 / 7
आयपीएल 2016 साठी आरसीबीच्या लोगोत महत्वपूर्ण बदल करण्यात आला. या लोगोत आरसीबी नावाऐवजी सिंहाच्या प्रतिमेला प्राधान्य दिलं गेलं. हा लोगो 2019 पर्यंत कायम ठेवला गेला.
6 / 7
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2020 मध्ये आपला लोगो पूर्णपणे बदलला. यावेळी सिंहाच्या प्रतिमेवर सर्वाधिक प्रकाशझोत टाकला गेला. मागच्या तीन वर्तुळाकार लोगोपेक्षा या लोगोत वेगळेपण दिसलं. मागच्या पर्वापर्यंत हाच लोग वापरून संघ मैदानात उतरला.
7 / 7
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 17 व्या पर्वात नव्या लोगोसह उतरणार आहे. इतकंच काय तर बंगलोर ऐवजी बंगळुरु हे नाव असेल. फ्रेंचायसीने शॉर्टफॉर्मला प्राधान्य दिलं आहे. यात RCB हे ठळकपणे दिसत आहे.