IPL 2024 : आरसीबीने अखेर मुंबई इंडियन्सचा मासा गळाला लावला! या खेळाडूचा लवकरच होणार संघात प्रवेश
आयपीएलचं 17वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 22 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. त्यासाठी दहा संघ सज्ज असून मिनी ऑक्शननंतर ट्रेड विंडो आणि इतर माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण सुरु आहे. आता आरसीबीच्या ताफ्यात मुंबई इंडियन्स एक खेळाडू सामिल होणार आहे.
1 / 6
आयपीएल स्पर्धेत आरसीबीकडे एक तगडा संघ म्हणून पाहिलं जातं. पण अद्याप एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे 17 वं पर्व आपल्या नावावर करण्यासाठी संघ सज्ज आहे. असं असताना वेगवान गोलंदाज रीस टोपले आयपीएलमधूल बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
2 / 6
रिस टोपले दुखापतग्रस्त असल्याने त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लीग क्रिकेट स्पर्धा न खेळण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून त्याने नाव मागे घेतलं. आता आयपीएलसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूची संघात निवड करण्यासाठी आरसीबीने पावलं उचलली आहेत.
3 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत वेगवान गोलंदाजांचं महत्त्व ओळखून आरसीबीने मुंबई इंडियनच्या खेळाडूकडे मोर्चा वळवला. आरसीबीने रिस टोपलेच्या जागी ख्रिस जॉर्डनची निवड केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या पर्वात ख्रिस जॉर्डन आरसीबीकडून खेळण्याची शक्यता आहे.
4 / 6
मिनी ऑक्शनमध्ये ख्रिस जॉर्डन 1.50 कोटी बेस किमतीवर दिसला होता. मात्र त्याला खरेदी करण्यात कोणत्याही फ्रेंचायसीने रस दाखवला नाही. पण आता त्याचं नशिब चमकलं असून आरसीबीकडून खेळण्याची शक्यता वाढली आहे. ख्रिस जॉर्डन 2016 मध्ये आरसीबीकडून खेळला होता. यावेळी त्याने 9 सामन्यांत एकूण 12 विकेट घेतल्या. मात्र 2017 मध्ये त्याला आरसीबी संघातून वगळण्यात आले होते.
5 / 6
ख्रिस जॉर्डन 2017 आणि 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ मैदानात उतरला होता. त्यानंतर 2019 मध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर 2020 आणि 2021 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. त्यानंतर 2022 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडूनही खेळला होता. इंग्लंडकडून 88 टी-20, 35 एकदिवसीय आणि 8 कसोटी सामने खेळलेल्या ख्रिस जॉर्डनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 34 सामने खेळले आहेत.
6 / 6
ख्रिस जॉर्डनची 2023 मध्ये, जोफ्रा आर्चरच्या जागी त्याची मुंबई इंडियन्स संघात निवड झाली. आता ख्रिस जॉर्डन आरसीबी संघात बदली खेळाडू म्हणून प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.