विराट कोहली याने आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. विराट मैदानात उतरल्यानंतर रेकॉर्ड करतो. विराटने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात महारेकॉर्ड केला आहे.
आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. हा स्टेडियम आरसीबीचा होम ग्राउंड आहे. विराटने घरच्या मैदानात इतिहास रचलाय.
विराटचा एम चिन्नास्वामी स्टेडियममधील हा 100 वा टी 20 आय सामना ठरला आहे. विराट एकाच ग्राउंडमध्ये 100 सामने खेळणारा पहिला भारतीय ठरला आहे.
टी 20 क्रिकेटमध्ये एकाच स्टेडियममध्ये 100 सामने खेळण्याचा दुर्मिळ विक्रम आहे. विराट असा कारनामा करणारा 15 वा आणि पहिला भारतीय ठरलाय.
तसेच विराटच्याच नाववर एकाच स्टेडियममध्ये सर्वाधिक टी 20 धावांचा विक्रम आरे. विराटने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 39.95 च्या सरासरीने 3 हजार 276 धावा केल्या आहेत. विराटने यामध्ये 4 शतकं आणि 25 अर्धशतक ठोकली आहेत.