IPL 2024 | दुखापतीनंतर हे 5 स्टार कमबॅकसाठी सज्ज, मुंबईच्या एकाचा समावेश
IPL 2024 | आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आरसीबी असा होणार आहे. या 17 व्या हंगामातून 5 दिग्गज खेळाडूंची दुखापतीनंतर एन्ट्री होणार आहे. हे 5 खेळाडू कोण आहेत? जाणून घ्या.
1 / 5
विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. पंतला गेल्या हंगामात अपघातामुळे खेळता आलं नाही. मात्र आता पंत आता सज्ज झाला आहे.
2 / 5
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे 16 व्या हंगामात खेळता आलं नाही. बॅक इंजरीमुळे बुमराहला 16 व्या मोसमाला मुकावं लागंल. बुमराहने आयर्लंड दौऱ्यातून कमबॅक केलं. बुमराह तेव्हापासून सातत्याने खेळतोय. आता बुमराह मुंबईला सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यासाठी तयार आहे.
3 / 5
केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीनंतर आता कमबॅकसाठी तयार झालाय. श्रेयसला गत हंगामात खेळता आलं नाही. मात्र त्याने आशिया कपमधून कमबॅक केलं. श्रेयसला अधेमधे दुखापतीचा सामना करावा लागला. मात्र त्याने टीकाकारांना चोख उत्तर देत, दुखापतीवर मात करत कमबॅक केलं. आता तो आयपीएल खेळण्यासाठी सज्ज आहे.
4 / 5
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला गेल्या हंगामात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे केएलला संपूर्ण हंगामाला मुकावं लागलं. केएलने वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिली केली. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला खेळता आलं नाही. आता केएल राहुल पूर्णपणे फिट झाल्याचं म्हटलं जात आहे.
5 / 5
न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विलियमसन याला गेल्या हंगामातील पहिल्याच सामन्यात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. केन तिथूनच आयपीएलमधून बाहेर झाला. त्यानंतर अनेक महिन्यांनी केनचं आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये कमबॅख झालं. आता तो आयपीएलसाठी सज्ज झाला आहे.