आरसीबीच्या गोलंदाजीला आणखी चढणार धार! जखमी टॉम करनच्या जागी या खेळाडूसाठी फिल्डिंग
आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीला एका वेगवान गोलंदाजाचा शोध आहे. कारण टॉम करन बिग बॅश लीग स्पर्धेत जखमी झाल्याने आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे आरसीबीबची शोधाशोध सुरू असून एक नाव अंतिम टप्प्यात आलं आहे.
1 / 6
आयपीएल स्पर्धेत पहिलं जेतेपद मिळवण्यासाठी आरसीबी संघाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पण काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी पर्याय शोधण्याचं काम सुरु आहे.
2 / 6
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करन हा बिग बॅश लीग स्पर्धेदरम्यान जखमी झाला होता. तो बरा होईल अशी शक्यता वाटत होती. पण तसं काही होताना दिसत नाही. म्हणून आरसीबीने त्याच्या जागा भरून काढण्यासाठी एका वेगवान गोलंदाजाची निवड केली आहे.
3 / 6
फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला करारबद्ध करण्यास उत्सुक आहे. जोफ्रा आर्चर गेल्या 3 वर्षांपासून आयपीएल खेळलेला नाही. सतत दुखापतींनी त्रस्त असल्याने अनेक स्पर्धांना मुकला आहे. आर्चर सध्या भारतात असून बंगलोरमध्येच आहे.
4 / 6
आर्चर सध्या त्याच्या काउंटी क्लब ससेक्ससोबत भारत दौऱ्यावर आहे. ससेक्स संघ प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. संघ सध्या बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. आर्चरला या हंगामात खेळण्यासाठी आरसीबीने संपर्क केल्याची बातमी समोर आली आहे
5 / 6
टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आर्चर ससेक्स संघासोबत भारतात आला होता. टी20 विश्वचषक जूनमध्ये होणार आहे. त्याआधी आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी इंग्लंडची अपेक्षा आहे. तत्पूर्वी आयपीएल स्पर्धेत नशिब आजमावू शकतो. मात्र तो खेळणार की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.
6 / 6
आयपीएल 2024 साठी RCB संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, मनोज भंडागे, मयंक डागर, विल जॅक्स, महिपाल शर्मा, लोन कर्णधार. जोसेफ, आकाश दीप, मोहम्मद सिराज, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, रीस टोपले, हिमांशू शर्मा, स्वप्नील सिंग, टॉम करन, सौरव चौहान, यश दयाल, लकी फर्ग्युसन.