IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर नकोसा विक्रम, असं पहिल्यांदाच घडलं
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची नकोशी कामगिरी सुरुच आहे. संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू पण विजयाचं गणित फिस्कटलं आहे. मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या पराभवानंतर नकोसा विक्रम नावावर केला आहे.
1 / 6
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकूण सहा सामने खेळला आहे. त्यापैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तर आरसीबीने आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम नोंदवला आहे. (Photo : BCCI/IPL)
2 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 27 चेंडू आणि 7 गडी राखून पराभूत केलं. या विजयाससह मुंबई इंडियन्सने सातव्या झेप घेतली आहे. तर आरसीबीची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. (Photo : BCCI/IPL)
3 / 6
आरसीबीने 197 धावा केल्या होत्या. मात्र असं करूनही मुंबईने हा सामना एकहाती जिंकला. आरसीबीकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र संघाच्या धावा 200 च्या पार जाऊ शकल्या नाहीत. (Photo : BCCI/IPL)
4 / 6
तीन अर्धशतकं झळकावून 200 धावांचा पल्ला न गाठणारा आरसीबी हा आयपीएल इतिहासातील पहिलाच संघ आहे. त्यामुळे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. (Photo : BCCI/IPL)
5 / 6
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा सर्वात कमी चेंडूत 190 पेक्षा जास्त धावा गाठल्या आहेत. यापूर्वी मुंबईने राजस्थानविरुद्ध 32 चेंडू राखून 190 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. तर 2017 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 27 चेंडू राखून 199 धावा केल्या होत्या. (Photo : BCCI/IPL)
6 / 6
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतक खेळी केली. आयपीएल इतिहासात एका संघातील तीन खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करताना अर्धशतक ठोकण्याची ही 11वी वेळ आहे. (Photo : BCCI/IPL)