IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अजूनही प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी, कसं ते समजून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेच्या 17व्या पर्वात प्लेऑफचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे. आरसीबी संघ आतापर्यंत 8 पैकी एका सामन्यात विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या आशा धूसर झाल्या आहेत. असं असलं तरी प्लेऑफचं गणित सुटू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात या समीकरणाबाबत
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची हाराकिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात फक्त 2 गुण असून गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.
2 / 6
आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आरसीबीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मात्र उर्वरित सहा सामन्यात चमकदार कामगिरी केली तरी प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. कसं आहे प्लेऑफचं गणित ते समजून घ्या
3 / 6
आतापर्यंत कोणताही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेला नाही. आयपीएलमध्ये 16 गुण मिळवणारा संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करतो. सध्या तरी राजस्थान रॉयल्सचे 12 गुण आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी 10 गुण आहेत.
4 / 6
तीन संघांना 16 गुण मिळवण्याची संधी असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतात. जर चौथा संघ 16 गुण मिळवू शकला नाही. तर मात्र आरसीबीला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. कारण 14 गुणांसह आरसीबी आपलं स्थान प्लेऑफमध्ये निश्चित करू शकते.
5 / 6
आरसीबीने आपल्या उर्वरित सहा सामन्यात चांगल्या नेट रनरेटने बाजी मारली तर शक्य आहे. 14 गुण आणि चांगल्या नेट रनरेटसह चौथ्या स्थानी पोहोचू शकते. तसेच प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे.
6 / 6
टॉपचे चार संघ 16 गुण जिथपर्यंत मिळवत नाहीत. तोपर्यंत आरसीबीच्या आशा जिवंत असणार आहेत. त्यामुळे आता येथून पुढे स्पर्धेत कसा रंग चढतो आणि प्लेऑफमध्ये कोण स्थान मिळवतो याची उत्सुकता आहे.