वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सुरु असतानाच प्रशिक्षकपदावरून हटवण्यासाठी खलबतं सुरु, गांगुलीच्या नावाची शिजतंय चर्चा
आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाची सुमार कामगिरी राहिली आहे. त्यामुळे संघ व्यस्थापन संघात मोठा बदल करण्याचा विचारात आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
1 / 7
आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची सुमार कामगिरी राहिली. संघाने 14 पैकी 5 सामने जिंकले आणि उर्वरित 9 सामने हरले. संघाचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे संघात मोठे फेरबदल करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या व्यवस्थापनाने मुख्य प्रशिक्षकपदासाठी दुसरी निवड करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत फ्रँचायसीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
2 / 7
दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेला माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे.
3 / 7
पाँटिंग 2018 पासून दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. त्याच्या कोचिंगखाली 2020च्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाने प्रथमच आयपीएलचा अंतिम सामना खेळला.
4 / 7
व्यवस्थापनाने पाँटिंगला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या जागी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांची निवड करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या पर्वापर्यंत गांगुली दिल्ली संघाचा संचालक म्हणून संघासोबत होता. आता या संघाचे प्रशिक्षकपद गांगुली सांभाळणार असल्याचे वृत्त आहे.
5 / 7
आयपीएलच्या सुरुवातीपासून दिल्ली फ्रँचायसी संघ खूपच कमकुवत मानला जात होता. पण पाँटिंग प्रशिक्षक झाल्यानंतर संघाची परिस्थिती बदलली. या संघाने 2019 मध्ये अनेक वर्षांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यानंतर 2021 पर्यंत हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला होता.
6 / 7
प्ले ऑफमध्ये खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाला जेतेपद पटकावता आले नाही. गेल्या मोसमात दिल्ली संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. दिल्लीने 14 सामने खेळले त्यापैकी फक्त पाच सामने जिंकले आणि नऊ सामने गमावले. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स संघ नवव्या स्थानावर होता.
7 / 7
पॉन्टिंग हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी प्रशिक्षक मानला जातो. 2015 मध्ये मुंबईने त्याच्या प्रशिक्षणात आयपीएल जिंकले होते. नंतर दिल्ली संघात सामील झालेल्या पाँटिंगने आपल्या प्रशिक्षणाखाली संघ बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.