IPL 2024 : अगली बार 300 पार! सनरायझर्स हैदराबादने रणशिंग फुंकलं, आरसीबीला फुटला घाम

| Updated on: Apr 22, 2024 | 6:03 PM

आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत आयपीएमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. असं एकदा नाही दोनदा केलं आहे. त्यामुळे आता पुढचं लक्ष्य 300 धावांचं असून नववा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी आहे.

1 / 5
आयपीएलच्या 17 व्या पर्वात सनरायझर्स हैदराबादचा बोलबाला आहे. तीनवेळा 250 च्या पार धावसंख्या केली आहे. त्यामुळे पुढचं लक्ष्य हे 300 धावांचं आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यानंतर अभिषेक शर्माला प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्याने पुढील लक्ष्य 300 धावांचं असेल असं सांगितलं होतं.

2 / 5
सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. हा सामना 25 एप्रिलला हैदराबादमध्ये होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील हा 41 वा सामना असून यात जबरदस्त फलंदाजीचं दर्शन होऊ शकतं.

3 / 5
बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात झालेल्या सामन्यात यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने 287 धावा केल्या होत्या. तसेच आतापर्यंत आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या आहे. आता सनरायझर्स हैदराबाद 300 धावांचं लक्ष्य घेऊन आरसीबीशी सामना करणार आहे.

4 / 5
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 287 धावा आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 266 धावा केल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात 300 धावांचा पल्ला गाठला जाईल असा विश्वास आहे.

5 / 5
आरसीबीचं प्लेऑफचं स्थान डळमळीत झालं आहे. खरं सांगायचं तर हे गणित सुटणं खूपच कठीण आहे. त्यामुळे हैदराबादविरुद्ध पराभव झाल्यास स्पर्धेतून बाद होणार पहिला संघ ठरेल. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने 300 धावांचं लक्ष्य ठेवलं असलं तरी आरसीबीसाठी करो या मरोची लढाई आहे.