IPL 2024 : गुजरात आणि राजस्थानचा जीव भांड्यात पडला, त्या दोन खेळाडूंसाठी मिळाला पर्याय
आयपीएल स्पर्धेचं 17 व्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही संघातून प्रत्येकी एक खेळाडू स्पर्धेला मुकला होता. त्यामुळे नव्या खेळाडूचा शोध सुरु होता. अखेर खटाटोप पूर्ण झाला असून नवे खेळाडू चमूत सामील झाले आहेत.
1 / 7
गुजरात जायंट्सने मिनी लिलावात युवा यष्टीरक्षक फलंदाजाला आपल्या संघात सहभागी करून घेतलं होतं. पण ऐन स्पर्धा तोंडावर असताना युवा यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन मिन्झ याचा अपघात झाला. त्यामुळे त्याला स्पर्धेला मुकावं लागलं.
2 / 7
आयपीएल 2024 मिनी लिलावत गुजरात टायटन्सने रॉबिन मिन्झला 3.60 कोटी रुपयात विकत घेतलं होतं. आता त्याच्या जागी फ्रेंचायसीने बीआर सरथला 20 लाखांच्या बेस प्राईससह घेतलं आहे.
3 / 7
बीआर सरथ कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 20 प्रथम श्रेणी सामन्यात 616 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 43 लिस्ट ए सामन्यांमध्ये 732 आणि 28 टी20 सामन्यात 328 धावा केल्या आहेत.
4 / 7
गुजरातसारखंच राजस्थान रॉयल्स ऐनवेळी खेळाडूची शोधाशोध करावी लागली होती. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एडम झाम्पाने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याच्या जागी आता तनुष कोट्यान याला घेतलं आहे.
5 / 7
राजस्थान संघात सामील झालेल्या तनुष कोट्यानने सध्याच्या रणजीमध्ये मुंबईसाठी चमकदार कामगिरी केली आहे. रणजीमध्ये खेळल्या गेलेल्या 14 डावांमध्ये त्याने 41.83 च्या सरासरीने 502 धावा केल्या. यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. कोट्यानने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आणि 18 डावात 29 बळी घेतले.
6 / 7
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, जोस बटलर, ध्रुव जुरेल, कुणाल राठोर, डोनोव्हन फरेरा, टॉम कोहलर-कॅडमोर, शिमरन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, रायन पराग, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, आबिद मुश्ताक, संजेंद्र चहल, चहलपथ नवदीप सैनी, कुलदीप सेन, तनुष कोट्यान, नांद्रे बर्जर, आवेश खान.
7 / 7
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरजॉय, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बीआर सरथ.