IPL 2024 : आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीसह या फ्रेंचायसींनी बदललं आपलं नाव, जाणून घ्या संघांबाबत
आयपीएलचं 17वं पर्वाची क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. तत्पूर्वी काही फ्रेंचायसींनी आपल्या जर्सीत, नावात आणि खेळाडूंमध्ये बदल केला आहे. आरसीबीने आपल्या नावात बदल केला आहे. पण आरसीबी नावात बदल करणारी पहिली फ्रेंचायसी नाही. यापूर्वी तीन संघांनी आपल्या नावात बदल केला आहे. यात दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायसींचा समावेश आहे.
1 / 7
आयपीएल 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. तत्पूर्वी आरसीबीने बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात एका भव्य कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात एक बदल नावाबाबतचा होता.
2 / 7
मागच्या 16 पर्वात आरसीबी हा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या नावाने उतरला होता. आता 17 व्या पर्वापासून हा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या नावाने मैदानात उतरणार आहे.
3 / 7
नावात बदल करणारा आरसीबी हा काही पहिला संघ नाही. यापूर्वी तीन संघांनी आपल्या नावात बदल केला आहे. यात दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश आहे. या संघांच्या आधीच्या नावावर झलक टाकूयात
4 / 7
डेक्कन चार्जर्स फ्रेंचायसीने 2009 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर या फ्रेंचायसीचं नाव 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबाद करण्यात आलं. नावात बदल केल्यानंतर या 2016 मध्ये आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं होतं. दोन्ही वेळेस या फ्रेंचायसीने अंतिम फेरीत आरसीबीचा पराभव केला होता.
5 / 7
सनरायझर्स हैदराबादनंतर दिल्ली संघानेही नाव बदललं आहे. लीगच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स हा संघ दिल्ली डेअरडेव्हिल्स नावाने खेळत होता. 2018 मध्ये या संघाचं नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स केलं. मात्र नशिबाची साथ अजूनही मिळाली नाही. आरसीबीसारखंच या संघाची जेतेपदाची झोली रिती आहे.
6 / 7
दिल्ली कॅपिटलन्सनंतर पंजाबनेही आपल्या नावात बदल केला आहे. फ्रेंचायसीने 14 व्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब हे नाव बदललं आणि पंजाब किंग्स असं ठेवलं. पण या संघाचंही तेच रडगाणं आहे. अजूनही जेतेपदाची तहान भागलेली नाही.
7 / 7
सनरायझर्स हैदराबाद हा एकमेव संघ असा आहे की नाव बदलल्यानंतरही जेतेपद मिळवलं आहे. जर यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपद मिळवण्यात यश आलं तर नाव बदलल्यानंतर अशी किमया करणारा दुसरा संघ ठरेल.