IPL 2024 | 17 व्या हंगामात या 5 फलंदाजांमध्ये चढाओढ, कोण ठरणार सर्वोत्तम?

| Updated on: Mar 15, 2024 | 3:13 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमाला येत्या शुक्रवार अर्थात 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या 17 व्या हंगामात शानदार कामगिरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असणार आहे. त्यातही या 5 फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहेत.

1 / 5
रनमशीन विराट कोहली आरसीबीची आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आरसीबी आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण 3 वेळा फायनलमध्ये पोहचली आहे. मात्र आरसीबी तिन्ही वेळेस अपयशी ठरली आहे. विराट कोहली याने 16 व्या मोसमात 14 सामन्यांमध्ये  53.25 च्या सरासरीने 639 धावा केल्या. विराटने या दरम्यान 2 शतक आणि 6 अर्धशतकं ठोकली. आता विराट या आगामी हंगामात धावा करण्यासाठी सज्ज आहे.

2 / 5
हार्दिक पंड्या ट्रेडद्वारे मुंबई इंडियन्समध्ये गेल्याने शुबमन गिल याला गुजरात टायटन्सचं नेतृत्व देण्यात आलं आहे. शुबमन 16 व्या मोसमात ऑरेंज कॅप विनर ठरला होता. शुबमनने एकूण 17 सामन्यांमध्ये 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या. शुबमनने या दरमयना 3 शतक आणि 4 अर्धशतकं ठोकली होती.

3 / 5
आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने 16 व्या हंगामात 14 सामन्यात 8 अर्धशतकासंह 730 धावा केल्या. आता विराटसह फाफचाही या 17 व्या मोसमात झंझावात करण्याचा प्रयत्न असणार आहे.

4 / 5
मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव याची आक्रमक फलंदाजांमध्ये गणना केली जाते. सूर्यकुमार मैदानात चौफेर फटकेबाजी करण्यात तरबेज आहे. सूर्याने गत मोसमातील 16 सामन्यांमध्ये 43.21 च्या सरासरीने 605 धावा केल्या होत्या.

5 / 5
यशस्वी जयस्वालचा झंझावात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरुच आहे. यशस्वीने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 712 धावा केल्या. यशस्वीने आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा केल्या होत्या. यशस्वीला याच कामगिरीनंतर टीम इंडियात संधी मिळाली.