IPL 2024 : तळाशी असूनही आरसीबी प्लेऑफमध्ये मिळवणार स्थान, कसं ते समजून घ्या
आयपीएल स्पर्धेचा आता मध्यांतर पार पडला आहे. बहुतांश संघांनी आपला सातवा सामना खेळला आहे. त्यामुळे उर्वरित सात सामन्यावर प्लेऑफचं गणित आहे. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. तरीही प्लेऑफची दारं आरसीबीसाठी उघडी आहेत.
1 / 6
आयपीएलच्या 17 व्या पर्वात आरसीबीची हाराकिरी सुरुच आहे. सात पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही याची धाकधूक चाहत्यांना लागून आहे. 21 एप्रिलला आरसीबी आपला आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळणार आहे.
2 / 6
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित सात सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सात सामन्यावर आरसीबीचं प्लेऑफचं भवितव्य अवलंबून आहे.
3 / 6
आरसीबीने पुढील सात पैकी सात सामने जिंकले तर पदरात 14 गुण पडतील. तसेच सध्याचे दोन गुण पकडून 16 होतील. त्यामुळे टॉप 4 मध्ये सहज एन्ट्री मारता येईल.
4 / 6
गुणतालिकेत टॉप 2 संघांना 18 किंवा 20 गुण मिळाले तर चौथ्या स्थानावर असलेल्या संघाला 14 गुण मिळण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा आरसीबी 14 गुणांसह चांगल्या नेट रनरेटच्या मदतीने प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकते.
5 / 6
साखळी फेरीच्या उत्तरार्धात आरसीबीने आपली गाडी विजयाच्या ट्रॅकवर आणली तर फायदा होईल. फाफ डुप्लेसिसचे नेतृत्वात संघ कशी कामगिरी करतो याची उत्सुकता आहे. दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनीही प्रत्येक सामना सेमीफायनलसारखाच खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे.
6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पुढील सामने कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स (2 सामने), पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याविरुद्ध आहेत.