IPL 2024 : आयपीएल स्पर्धेत तीन रंगांच्या जर्सी वापरण्यावर बंदी, का आणि कशासाठी ते जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 22 मार्चला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. असं असताना जर्सीच्या रंग निवडीवरून एक प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर तीन रंग वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात का आणि कशासाठी ते
1 / 6
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत तीन रंगांवर बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयने स्पर्धेत सहभागी असलेल्या दहाही फ्रेंचायसींना याबाबत सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळेच काही संघांच्या जर्सीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
2 / 6
आयपीएल स्पर्धेत यापूर्वी तुम्ही जर्सीवर पांढरा, ग्रे आणि चंदेरी रंग पाहिले असतील. आता हे तिन्ही रंग वापरण्यास बीसीसीआयने मज्जाव केला आहे. तसेच त्या बदल्यात दुसरा रंग वापरण्याची सूचना केली आहे.
3 / 6
पंजाब किंग्स संघाच्या जर्सीमध्ये लाल रंगासह चंदेरी आणि राखाडी रंग होता. मात्र गेल्या दोन पर्वात पंजाब किंग्स लाल जर्सीसह मैदानात उतरत आहे. तसेच गुजरात टायटन्सच्या जर्सीत दिसणारा राखाडी रंगही गायब झाला आहे.
4 / 6
तीन रंग वापरण्यास मनाई करण्याचं मुख्य कारण म्हणजे पांढरा रंगाचा चेंडू हे आहे. पांढऱ्या रंगाच्या चेंडू पाहताना येणाऱ्या समस्या पाहून बीसीसीआयने या रंगांवर बंदी घातली आहे. पंजाब किंग्स आता त्यांच्या जर्सीत ग्रे किंवा सिल्व्हर रंग वापरत नाही.
5 / 6
तीन रंगांमुळे सर्वाधिक त्रास हा मैदानातील पंचांना होतो. निर्णय देताना पंचांना चेंडू शोधणं कठीण होतं. त्यामुळेच बीसीसीआयने या रंगांच्या जर्सीवर बंदी घातली आहे.
6 / 6
“आमच्या जर्सीत लाल, राखाडी आणि सिल्व्हर रंगाचे कॉम्बिनेशन होतं. परंतु चेंडू दिसण्यात अडचणीमुळे बीसीसीआयने सिल्व्हर, राखाडी आणि पांढऱ्या रंगावर बंदी घातली. म्हणून आम्ही लाल रंगात पुढे गेलो आणि या वर्षी आमच्याकडे लाल रंगाचे सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे,” असं प्रीति झिंटा एका कार्यक्रमात म्हणाली.