IPL 2024 : यंदा जेतेपदावर नाव कोण कोरणार? एबी डिव्हिलियर्सने घेतलं या संघाचं नाव
आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागच्या काही पर्वापासून एबी डिव्हिलियर्स आपल्या पसंतीच्या संघाचं नाव घेऊन जेतेपदासाठी जाहीर करतो. यावेळी कोणता संघ विजेता ठरेल? त्याने काय भाकीत केले आहे जाणून घ्या.
1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. 22 मार्चला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यापासून जेतेपदासाठीचा प्रवास सुरु होणार आहे. एकूण 14 सामने खेळल्यानंतर प्लेऑफ आणि नंतर अंतिम फेरीसाठी लढत होईल.
2 / 6
पहिल्या सामन्यापूर्वीत दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने आयपीएल जेतेपदाचं नाव जाहीर केलं आहे. तसेच यंदाची स्पर्धा चुरशीची होणार यात शंका नाही.
3 / 6
आयपीएलमधील दहा संघांमध्ये तगडे खेळाडू असून सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपली प्लेइंग इलेव्हन कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे आरसीबीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
4 / 6
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत महिला संघाने नुकतंच जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयाचा सकारात्मक प्रभाव पुरुष संघावरही पडेल यात शंका नाही. त्यामुळे यंदा हा चषक आमचाच आहे असं एबी डिव्हिलियर्सने स्पष्ट केलं आहे. एबीडीच्या भाकीतानुसार आरसीबी जेतेपदावर नाव कोरेल.
5 / 6
मागच्या 16 पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची झोळी रिती राहिली होती. त्यामुळे 17 व्या पर्वात आरसीबी जेतेपद मिळवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2009, 2011, 2016 या तीन पर्वात अंतिम फेरीत पोहोचला होता. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स, 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि 2016 मध्ये सनराईजर्स हैदराबादने पराभूत केलं होतं.
6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमरोन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.