IPL 2024: विराट कोहलीच्या संघाचं नशिब चमकणार का? पहिल्या टप्प्यात या पाच संघांशी भिडणार
आयपीएल 2024 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 22 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एकूण 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर झालं असून 21 सामने होणार आहेत. यात पाच सामने विराट कोहलीचा आरसीबी संघ खेळणार आहे. त्यामुळे पाच सामन्यातच पुढची वाटचाल स्पष्ट होणार आहे.
1 / 6
आयपीएल स्पर्धेच्या झालेल्या 16 पर्वात विराट कोहलीच्या आरसीबी संघाचं नशिब फुटकं निघालं आहे. एकही जेतेपद जिंकता आलं नाही. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही पदरी उपेक्षा पडली आहे. यंदा तरी जेतेपद जिंकणार का? असा प्रश्न आरसीबीच्या चाहत्यांना पडला आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकात आरसीबी पाच सामने खेळणार आहे.
2 / 6
22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. तामिळनाडूच्या एम चिदंबरम स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
3 / 6
आरसीबी या स्पर्धेतील दुसरा सामना 25 मार्च रोजी खेळणार आहे. हा सामना बेंगळुरूमध्ये होणार असून पंजाब किंग्जशी लढत असेल. हा सामनाही संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
4 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तिसरा सामना केकेआरविरुद्ध 29 मार्चला खेळणार आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम हा सामना होणार आहे. हा सामनाही संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
5 / 6
2 एप्रिल रोजी होणाऱ्या चौथ्या सामन्यात आरसीबीचा सामना लखनऊ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामनाही बंगळुरुमध्येच होत असून संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
6 / 6
आरसीबीचा पाचवा सामना 6 एप्रिल रोजी राजस्थानविरुद्ध होणार आहे. जयपूरच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असतील. हा सामनाही संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.