निकोलस पूरन स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो पूरनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. लखनौ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरनने टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे.
निकोलस पूरनने 30 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 250 चा होता.
विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान पूरनने टी20 क्रिकेटमध्ये 600 हून अधिक षटकार मारणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.
600 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी पूरनला एका षटकाराची आवश्यकता होती. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विप्रज निगमला एक लांब षटकार मारून त्याने हे यश मिळवले. पूरनने गेल, किरॉन पोलार्ड, रसेल यांच्या क्लबमध्ये प्रवेश केला.
ख्रिस गेलने 463 सामन्यांमध्ये 1056 षटकार मारले आहेत, तर किरॉन पोलार्डने 695 सामन्यांमध्ये 908 षटकार मारले आहेत. रसेलने 539 सामन्यांमध्ये 733 षटकार मारले आहेत. 385 व्या सामन्यात पूरनने 600षटकार पूर्ण केले. भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्माने 449 सामन्यांमध्ये 525 षटकार मारले आहेत. (सर्व फोटो- लखनौ सुपर जायंट्स ट्वीटर)