LSG Mentor: झहीर खानला मेन्टॉर म्हणून किती वेतन मिळणार?

| Updated on: Aug 29, 2024 | 7:06 PM

Zaheer Khan Salary LSG: गौतम गंभीर याच्यानंतर झहीर खान लखनऊ सुपर जायंट्सचा मेन्टॉर या भूमिकेत दिसणार आहे. झहीरला यासाठी किती वेतन मिळणार?

1 / 6
टीम इंडियाचा माजी दिग्गज गोलंदाज श्रीरामपूर एक्सप्रेस अर्थात झहीर खान याचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे. झहीरची लखनऊ सुपर जायंट्सच्या मेन्टॉरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झहीर आयपीएल 2025 मध्ये एलएसजीसाठी निर्णायक भूमिका बजावताना दिसणार आहे. झहीरने गौतम गंभीरची जागा घेतली आहे.(Photo Credit : LSG X Account)

2 / 6
झहीरने याआधी मुंबई इंडियन्ससह योगदान दिलं आहे. मात्र आता त्याच्याकडे लखनऊची जबाबदारी आहे. गंभीर टीम इंडियाचा कोच झाल्याने लखनऊ सुपर जायंट्स टीमचं मेन्टॉर हे पद रिक्त होतं. त्या जागी झहीरला संधी मिळाली. (Photo Credit : Zaheer Khan X Account)

3 / 6
झहीरने आयपीएलमध्ये मुंबईसोबत बराच काळ घालवला आहे. झहीरने  गोलंदाज म्हणून शानदार कामगिरी केली आहे. झहीरने आयपीएलमध्ये 100 सामन्यात 102 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Credit : IPL Facebook)

4 / 6
झहीरला लखनऊचा मेन्टॉर म्हणून किती पगार मिळणार? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र झहीरला नक्की किती वेतन मिळणार? हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र गंभीरने या पदासाठी मोठी रक्कम आकारली. (Photo Credit : LSG X Account)

5 / 6
झहीरला एका हंगामासाठी कोटींपेक्षा अधिक  रक्कम मिळणार हे निश्चित आहे. एका वेबसाईटनुसार, गंभीरला मेन्टॉर म्हणून एका मोसमासाठी 3 कोटी 50 लाख रुपये मिळायचे. (Photo Credit : Zaheer Khan X Account)

6 / 6
झहीर टीम इंडियाचा यशस्वी माजी गोलंदाजांपैकी एक आहे. झहीरने आपल्या बॉलिंगने एक काळ गाजवला आहे. झहीर 2011 वनडे वर्ल्ड कप विजयी संघाचा भाग होता. (Photo Credit : LSG X Account)