गौतम गंभीरच्या जागी कुमार संगकाराची नियुक्ती होणार? शेवटच्या टप्प्यातील चर्चा सुरु
राहुल द्रविड यांनी टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सोडलं आणि त्यानंतर बऱ्याच उलथापालथी झाल्या. कोलकात्याचा मेंटॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कर्णधार झाला. राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर झाला आणि आता आणकी एक घडामोड होण्याची शक्यता आहे.
1 / 6
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी संघांमध्ये बऱ्याच उलथापालथी होताना दिसत आहेत. आयपीएलच्या पहिल्या पर्वात विजयी ठरलेल्या राजस्थान रॉयल्स संघात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. या संघाच्या मेंटॉरपदी राहुल द्रविडची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघाचा भाग राहिला आहे.
2 / 6
राहुल द्रविडच्या आगमनानंतर राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीचे संचालक कुमार संगकारा दुसऱ्या संघात सामील होण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार, भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी कुमार संगकारा फ्रँचायझी सोडण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे.
3 / 6
विक्रम राठोड यांच्या म्हणण्यांनुसार, कुमार संगकारा कोलकाता नाईट रायडर्सच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत आहे. गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त होताच हे पद रिक्त झालं आहे.कोलकाता नाईट रायडर्स संघात अनेक सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.
4 / 6
गौतम गंभीर याच्यासह फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन टेन डॉस्केट यांनी केकेआर सोडली आहे. तसेच भारतीय कोचिंग स्टाफमध्ये सामील झाले आहेत.
5 / 6
टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, केकेआर आता कुमार संगकारासोबत मेंटरच्या भूमिकेसाठी बोलणी करत आहे. मात्र, केकेआरशिवाय संगकाराला इतर संघांकडून ऑफर आल्या आहेत. त्यामुळे संगकारा काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागून आहे.
6 / 6
कुमार संगकाराची 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच्या कार्यकाळात राजस्थान संघ 2022 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आयपीएल 2024 मध्ये राजस्थान संघाला एलिमिनेटरमध्ये आरसीबीविरुद्ध पराभवाची चव चाखावी लागली होती.