IPL 2025 : विराट-धोनी आणि रोहितबाबत मायकल वॉनचं अजब उत्तर, गिलख्रिस्टने दिला पाठिंबा
आयपीएल 2025 बाबत चर्चा सुरु झाली आहे. लवकरच कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं आणि कोणाला रिलीज करायचं? या चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना एक पॉडकास्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी एका प्रश्नाचं अजबगजब उत्तर दिलं आहे.
1 / 5
आयपीएलच्या 18व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. यासाठी कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला सोडायचं यावर खलबतं सुरु आहेत. असं असताना एक पॉडकास्टवर चर्चा करताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने आपलं मत जाहीर केलं आहे.
2 / 5
पॉडकास्टमध्ये मायकल वॉन आणि एडम गिलख्रिस्ट यांना आयपीएलबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. जर तुमचा आयपीएलमध्ये संघ असेल तर, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीपैकी कोणाला घ्याल आणि कोणाला बेंचवर बसवाल आणि कोणाला रिलीज कराल?
3 / 5
या प्रश्नावर मायकल वॉनने थेट उत्तर दिलं आणि म्हणाला की, मला सर्वोत्तम कर्णधाराची आवश्यकता आहे. तर मी सर्वात आधी महेंद्रसिंह धोनीला प्राधान्य देईल. कारण तो एक चांगला कर्णधार आहे.
4 / 5
मायकल वॉनने रोहित शर्माबाबत सांगितलं की, धोनीचा पर्याय म्हणून रोहित शर्माकडे पाहतो. कारण त्याने सहावेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे रोहित शर्मा माझ्यासाठी दुसरा पर्याय असेल.
5 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला विकू इच्छित असल्याचं त्याने सांगितलं. कारण त्याने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. विराट कोहलीला विकून चांगली रक्कम मिळवता येईल. मायकल वॉनचं म्हणणं गिलख्रिस्टला पटलं आणि त्याने सांगितलं की, मला वाटतं हा चांगला विचार आहे.