आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचं वातावरण; बुमराह दुखापतग्रस्त, तर आणखी खेळाडू स्पर्धेला मुकला

| Updated on: Feb 12, 2025 | 2:12 PM

आयपीएलच्या 18 व्या पर्वाची जोरदार तयारी सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संपली की लगेचच आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. असं असताना मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मेगा लिलावात मुंबई इंडियन्स चांगला संघ बांधला आहे. पण आता मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला असून तो आयपीएलपर्यंत ठीक होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफर आयपीएल 18व्या हंगामातून बाहेर पडला आहे.

2 / 5
आयपीएल मेगा लिलावात अफगाणिस्तानचा अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने तब्बल 4.80  कोटी रुपयांना खरेदी केले होते. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर त्याचा वापर करण्याची योजना होती. मात्र आता या रणनितीसाठी नव्या फिरकी गोलंदाजाचा विचार करावा लागणार आहे.

3 / 5
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यादरम्यान अल्लाह गझनफरला दुखापत झाली.  या दुखापतीमुळे पुढचे चार महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे, अल्लाह गझनफर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणार नाही.

4 / 5
अल्लाह गझनफर ओव्हरसीज प्लेयर असल्याने मुंबई इंडियन्स पर्यायी परदेशी खेळाडूची निवड करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका टी20 लीग किंवा आंतरराष्ट्रीय टी20 लीगमध्ये विशेषतः चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे संधी आहे.

5 / 5
मुंबई इंडियन्स संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंझ, कर्ण शर्मा, दीपक चहर, रीस टोप्ले, रायन रिकेल्टन, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कर्ण शर्मा, राजवा शर्मा, सत्यनारायण राजू, राज बावा, कृष्णन श्रीजीत, अश्वनी कुमार, बेवन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिझ विल्यम्स.