IPL 2025 : केकेआरने श्रेयस अय्यरला रिलीज करताच या खेळाडूचं नशिब फळलं! खांद्यावर दिला जाणार नेतृत्त्वाची धुरा

| Updated on: Nov 13, 2024 | 3:14 PM

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी दहाही फ्रेंचायझींमध्ये उलथापालथ झाली आहे. त्यामुळे नव्या पर्वात कोणते खेळाडू कोणत्या संघात ते मेगा लिलावानंतरच स्पष्ट होईल. कोलकाता नाईट रायडर्सनेही सहा खेळाडूंना रिटेन केलं आहे. त्यात कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज केलं आहे. त्यामुळे आरटीएम कार्ड वापरण्याचा प्रश्नही येत नाही. त्यामुळे रिटेन केलेल्या सहापैकी एकाच्या खांद्यावर नेतृत्व सोपवलं जाणार आहे. त्यापैकी एक नाव चर्चेत आलं आहे.

1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व कोण करणार? याची चर्चा रंगली आहे. कारण फ्रेंचायझीने जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला रिलीज केलं आहे. त्यामुळे कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ही चर्चा रंगली आहे. त्यात कोलकात्याने सहा खेळाडू  रिटेन केले आहेत. त्यामुळे श्रेयससाठी आरटीएम कार्ड वापरणं शक्य नाही. त्यामुळे रिटेन केलेल्या सहापैकी एकाला नेतृत्व सोपवलं जाणार यात शंका नाही.

2 / 5
कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन केलेल्या सहा खेळाडूंमध्ये रिंकु सिंह 13 कोटी, वरुण चक्रवर्ती 12 कोटी, सुनील नरीन 12 कोटी, आंद्रे रसेल 12 कोटी, हर्षित राणा 4 कोटी, रमणदीप सिंग 4 कोटी अशी रक्कम देऊन खेळाडू रिटेन केले आहेत. 120 कोटीपैकी 57 कोटी केकेआरने खर्च केले असून 63 कोटी शिल्लक आहेत. यात किमान 12 खेळाडू घेणं भाग आहे. त्यामुळे रिटेन केलेल्या 6 पैकी एकाची कर्णधारपदासाठी निवड होणार यात शंका नाही.

3 / 5
केकेआर कर्णधारपदाच्या शर्यतीत रिंकु सिंहचं नाव आघाडीवर आहे. मात्र केकेआरने त्याच्या नावाबाबत अधिकृत असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे मेगा लिलावात नेतृत्व गुण असलेला एखादा खेळाडू गळाला लागला नाही. तर रिंकु सिंहकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
संघात सुनील नरीन, आंद्रे रसेलसह अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे रिंकू सिंग त्याच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार म्हणून दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

5 / 5
कोलकाता नाईट रायडर्सने मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे यंदा जेतेपद आपल्याकडे पुन्हा ठेवण्याचा मानस असेल. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत तीनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. दोन वेळेस गौतम गंभीरच्या नेतृत्वात, तर एकदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद मिळवलं आहे.